जामनेर तालुक्यातील २२ रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
जळगाव :
येथील गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील २२ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले असून पुढील काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शनही करण्यात आले.
जामनेर तालुक्यातील काही गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. याची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी रामदास पाटील यांनी संबंधित रुग्णांना शासकीय वैद्यकीय माध्यमिक रुग्णालय, जळगाव येथे दाखल करून घेतले. रुग्णांची प्राथमिक व आवश्यक वैद्यकीय तपासणी करून त्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या.
या शस्त्रक्रिया डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयुरी राठोड, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. विवेक सोलंकी, डॉ. मयुरेश डोंगरे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी केल्या. त्यांना परिचारिका सुनिता वक्ते, भाग्यश्री ढाकणे, वैष्णवी डांदगे, हिरा पालवी यांनी सहकार्य केले. संपूर्ण उपचार प्रक्रियेस अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
जामनेर तालुक्यातील २२ रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
By coadmin
On: January 2, 2026 5:43 AM
---Advertisement---











