होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Udhna-Pune Special Train: उधना-पुणे स्पेशल ट्रेनला हिरवा कंदील, खा. स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

On: February 19, 2026 12:42 PM
Follow Us:
---Advertisement---

Udhna-Pune Special Train : जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच पुणे परिसरातील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. उधना- पुणे स्पेशल ट्रेनचा प्रस्ताव निर्णायक टप्प्यात पोहोचल्याने ताप्ती सेक्शनमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही प्रस्तावित स्पेशल ट्रेन नंदुरबार-जळगाव-मनमाड या ताप्ती मार्गावरून धावणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र व गुजरातदरम्यान थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित होणार आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

खा. स्मिता वाघ यांनी या प्रस्तावाला प्राधान्य देत   प्रशासनाशी औपचारिक संपर्क साधला. तसेच   मुख्यालय, पुणे व भुसावळ रेल्वे विभागांशी समन्वय साधून व्यवहार्यता, वेळापत्रक आणि संचालन क्षमतेबाबत सविस्तर चर्चा केली. प्रशासनिक पातळीवर संबंधित विभागांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

धरणगाव तालुका प्रवासी मंडळानेही सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. मंडळाचे अध्यक्ष व पश्चिम रेल्वेचे  सदस्य महेंद्र कोठारी यांनी उच्च अधिकाऱ्यांसमोर प्रवाशांच्या अडचणी मांडल्या. पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक  आणि परिचालन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत तांत्रिक व वेळापत्रकासंदर्भातील मुद्द्यांवर सकारात्मक सहमती दर्शविण्यात आल्याचे समजते.

ट्रेन सुरू झाल्यास संभाव्य फायदे

  • ताप्ती सेक्शनमधील प्रवाशांना थेट सेवा.
  • मनमाड, चाळीसगाव, पाचोरा परिसरातील प्रवास सुलभ.
  • तिकीट वेटिंग कमी होण्याची शक्यता.
  • व्यापार, शिक्षण व रोजगारासाठी सोयीस्कर मार्ग.
  • शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी थेट सुविधा.
  • उधना, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड मार्गे पुणे असा संभाव्य मार्ग चर्चेत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पाऊले चालती पंढरीची वाट… संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला पालखी करणार प्रस्थान

Jalgaon News: जळगाव विधान परिषद निवडणूक; अपक्ष उमेदवार महायुतीचे गणित बिघडवणार, 16 उमेदवार रिंगणात

गुटखा माफियांचे धाबे दणाणले, राज्यातील कारवाईत ‘इतक्या’ जणांच्या मुसक्या आवळल्या

पुणे- पिंपरी चिंचवड दारू भेसळप्रकरणी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड

Monsoon Rain El NINO: राज्यात यंदा कमी पाऊस, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

11th Admission: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार; विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज

Leave a Comment