होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ladki Bahin Yojana : खुशखबर! ई-केवायसी दुरुस्तीची संधी, आजपासून पोर्टल सुरू

On: February 7, 2026 4:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Ladki Bahin Yojana : अद्याप ई-केवायसी पूर्ण न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून पुन्हा आजपासून (दि. 6 फेब्रुवारी 2026) ई-केवायसी पोर्टल सुरू करण्यात आले असून, आता 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.

या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांनी तक्रारी दाखल केल्या, तर काही भागात आंदोलनेही झाली.

या पार्श्वभूमीवर विभागाने गंभीर दखल घेत लाभार्थींच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच नियमबाह्य पद्धतीने सादर दिलेल्या अर्जाची छाननी सुरु केली आहे. दरम्यान, पुन्हा आजपासून ई-केवायसी पोर्टल सुरू करण्यात आले असून,  आता 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.

काहींना 4500 तर काहींना मिळणार फक्त 1500

नव्या नियमानुसार, ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते मिळाले नाही, त्यांना फेब्रुवारी महिन्यात एकत्रित 4500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. तर काही लाभार्थींना महापालिका निवडणुकांमुळे जानेवारीत केवळ हप्ता देण्यात आला होता. त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आधीच मिळाले आहेत, त्यांना जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता नियमितपणे दिला जाईल.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पाऊले चालती पंढरीची वाट… संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला पालखी करणार प्रस्थान

Jalgaon News: जळगाव विधान परिषद निवडणूक; अपक्ष उमेदवार महायुतीचे गणित बिघडवणार, 16 उमेदवार रिंगणात

गुटखा माफियांचे धाबे दणाणले, राज्यातील कारवाईत ‘इतक्या’ जणांच्या मुसक्या आवळल्या

पुणे- पिंपरी चिंचवड दारू भेसळप्रकरणी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड

Monsoon Rain El NINO: राज्यात यंदा कमी पाऊस, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

11th Admission: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार; विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज

Leave a Comment