होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ladki Bahin Yojana : काहींना 4500 तर काहींना मिळणार फक्त 1500, समोर आली मोठी अपडेट

On: February 5, 2026 1:54 PM
Follow Us:
---Advertisement---

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत थकीत असलेल्या तीन महिन्यांच्या हप्त्यांचा एकत्रित लाभ देण्याचा महात्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाने माहिती दिली असून, या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषतः ई-केवायसी प्रक्रियेअभावी ज्यांचे हप्ते रखडले होते, अशा लाभार्थी महिलांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.

या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांनी तक्रारी दाखल केल्या, तर काही भागात आंदोलनेही झाली. ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी वाढली होती.

या पार्श्वभूमीवर विभागाने गंभीर दखल घेत लाभार्थींच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियमबाह्य पद्धतीने सादर दिलेल्या अर्जाची छाननी सुरु आहे. नव्या नियमानुसार, ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते मिळाले नाही, त्यांना फेब्रुवारी महिन्यात एकत्रित 4500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

तर काही लाभार्थींना महापालिका निवडणुकांमुळे जानेवारीत केवळ हप्ता देण्यात आला होता. त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आधीच मिळाले आहेत, त्यांना जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता नियमितपणे दिला जाईल.

तर आणखी मोठा आर्थिक आधार

दरम्यान, भविष्यात मासिक हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याबाबतही चर्चा सुरु असल्याचे समोर आले असून, तसे झाल्यास महिलांना आणखी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.) 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पाऊले चालती पंढरीची वाट… संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला पालखी करणार प्रस्थान

Jalgaon News: जळगाव विधान परिषद निवडणूक; अपक्ष उमेदवार महायुतीचे गणित बिघडवणार, 16 उमेदवार रिंगणात

गुटखा माफियांचे धाबे दणाणले, राज्यातील कारवाईत ‘इतक्या’ जणांच्या मुसक्या आवळल्या

पुणे- पिंपरी चिंचवड दारू भेसळप्रकरणी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड

Monsoon Rain El NINO: राज्यात यंदा कमी पाऊस, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

11th Admission: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार; विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज

Leave a Comment