होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Nirmala Navale : सोशल मीडिया लोकप्रियता अपुरी ठरली; कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव

On: February 9, 2026 1:45 PM
Follow Us:
---Advertisement---

 Nirmala Navale : शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग असलेल्या निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारेगाव–कान्हूर मेसाई गणातून त्या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी तब्बल ३०० मतांनी त्यांचा पराभव केला.

निर्मला नवले या सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर अत्यंत लोकप्रिय असून, त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या रिल्स, व्हिडीओ, हटके स्टाईल आणि स्पष्ट वक्तव्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत होती. आयटी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या निर्मला नवले यांची काही वर्षांपूर्वी कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर उच्चशिक्षित आणि लोकप्रिय महिला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. मात्र यंदाच्या निवडणुकीत ही लोकप्रियता मतांमध्ये रुपांतरित होऊ शकली नाही.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या २९९ जागांपैकी ७३ जागांचे निकाल जाहीर झाले असून भाजप २०, राष्ट्रवादी काँग्रेस २७, शिवसेना ७, ठाकरे गट २ आणि शरद पवार गट ३ जागांवर विजयी झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रचार थंडावला असतानाही पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला सहानुभूती मिळताना दिसत आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)  

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment