होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

IND vs PAK : कोण कोणावर पडणार भारी? ‘या’ पाच लढती ठरतील निर्णायक!

On: February 15, 2026 11:48 AM
Follow Us:
---Advertisement---

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून दोन्ही देशातील  क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्यात काही रोमहर्षक झुंजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः जसप्रीत बुमराह विरुद्ध साहिबजादा फरहान आणि उस्मान तारिक विरुद्ध हार्दिक पंड्या या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याआधी झालेल्या स्पर्धेत अभिषेक शर्मा आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शाहीनने अभिषेकला १९ चेंडू टाकले; त्यावर अभिषेकने ७ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे शाहीनला अद्याप अभिषेकला बाद करण्यात यश आलेले नाही.

दुसऱ्या बाजूला फरहानने बुमराहविरुद्ध ३४ चेंडूत ५१ धावा केल्या आहेत. मात्र बुमराहलाही त्याला बाद करता आलेले नाही. त्यामुळे नव्या चेंडूवरील ही झुंज निर्णायक ठरू शकते.

तसेच तिलक वर्मा आणि अबरार अहमद यांच्यातील सामना देखील रंगतदार ठरणार आहे. तिलकने २६ चेंडूत २३ धावा केल्या असून अबरारला त्याला बाद करता आलेले नाही.

याशिवाय सॅम अयुब आणि अर्शदीप सिंग यांच्यात डावाच्या सुरुवातीला चुरस होऊ शकते. फिरकीपटू उस्मान तारिक भारतीय फलंदाजांसाठी आव्हान उभे करू शकतो, विशेषतः हार्दिकविरुद्धची त्याची लढत सामन्याचा कल बदलू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रसाद सोनवणे याची ४० व्या ज्यु. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या चार खेळाडूंची निवड; विवेकानंद महाविद्यालयातील या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव

माहेश्वरी चोपडेची पंजाबमधील बॉक्सिंग चाचणीसाठी निवड

छत्रपती चषक अंतिम सामना: अटीतटीच्या लढतीत धानोरा संघाने पटकावला ‘छत्रपती चषक’; चोपडा छत्रपती शिवाजी महाराज संघ ठरला उपविजेता

इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस कर्णधार; आणखी कोणाची निवड झाली “ते” जाणून घ्या

IPL Mega Clash:’आरसीबी’समोर विजेतेपद कायम ठेवण्याचे आव्हान; गुजरात टायटन आरसीबीला रोखणार का?

Leave a Comment