होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महाराष्ट्राच्या राजकारणात शब्दयुद्ध; पंतप्रधान मोदींच्या संदर्भापर्यंत उडी…

On: February 12, 2026 2:52 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यात शब्दयुद्ध रंगले आहे. भाषिक मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादाने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भापर्यंत उडी घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषिक भूमिकेवर टीका करत “रटाळ प्रवचनांच्या राजकीय टीका करू नयेत” असे मत व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्युत्तर देताना राज ठाकरे नरेंद्र मोदींना घाबरतात, अशी उपरोधिक टीका केली. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले लोक मोदींना घाबरून आले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोश्यारी म्हणाले की, ते राज ठाकरे यांचा आदर करतात; मात्र त्यांनी मोदींना घाबरण्याचे कारण नाही. “मोदीजींसाठी सर्व जनता समान आहे. जसे प्रभू रामासाठी प्रजा समान होती, तसेच मोदींसाठीही सर्व समान आहेत,” असे त्यांनी म्हटले. तसेच राज ठाकरे यांनी मोदींच्या जवळ जावे, असेही त्यांनी सुचवले.

संजय राऊतांची कोश्यारी यांच्यावर टीका

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी आरोप केला की सत्तेचा आणि यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव आणला जातो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याबाबतच्या वादग्रस्त विधानांचा संदर्भ देत त्यांनी कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून भाषिक, वैचारिक आणि राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येणार याचे नियोजन सुरू: एकनाथ शिंदे

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

CJP म्हणजेच काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

Leave a Comment