JMC Election : जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराची सुरुवात झाली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 14 ‘अ’ मधील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या या प्रभागातील निवडणुकीत अशोक सिताराम लाडवंजारी हे निवडणुकीच्या रणांगणात आहे. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार, दि. 6 जानेवारी रोजी होत आहे.
जनसामान्यांच्या मनातला उमेदवार…
जनसामान्यांच्या मनातला उमेदवार म्हणून अशोक लाडवंजारी यांची ओळख आहे. प्रभागातील समस्यांची जाण, दांडगा जनसंपर्क आणि मनमिळाऊ स्वभाव हा अशोक लाडवंजारी यांची ही जमेची बाजू आहे.
उमेदवार अशोक लाडवंजारी, तडवी नाजमीन मकबुल, सना शेख रियाज, जमिललोद्दीन शेख शारीफुद्दीन शेख यांच्या प्रचार नारळाचा शुभारंभ मंगळवार, दि. 6 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता इच्छादेवी मंदिरात नारळ वाढवून आणि इच्छादेवी दर्शनाने होत आहे.
याप्रसंगी माजी मंत्री तथा लोकनेते आमदार एकनाथराव खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलिक, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक लाडवंजारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 14 ‘अ’च्या विकासासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात आहे. गेल्या काही वर्षात या प्रभागातील विकास रखडला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार महापौर असतानादेखील त्यांनी प्रभागाचा विकास केलेला नाही. प्रभागात स्वच्छता, साफसफाईचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे वार्डाचा विकास खुंटला आहे. प्रभागाचा विकास करण्यासाठी उमेवारी करीत असल्याचे अशोक लाडवंजारी यांनी ‘शौर्य मराठी’शी बोलताना सांगितले.









