होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

Video : जुमलेबाज महाजन दांपत्याने खदानाची जागा बिल्डरच्या घशात घातली; अशोक लाडवंजारी यांची घणाघाती टीका

On: January 7, 2026 1:52 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : माजी महापौर आणि विरोधी पक्षनेते राहिलेले महाजन दाम्पत्य प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांची दिशाभूल करीत आहे. महाजन दांपत्याकडे महापौर व विरोधी पक्षनेतेपद असताना त्यांनी मेहरूण गावठाणमधील सर्वे नंबर 424 ही जागा (खदान) एका बिल्डरच्या घशात घातली आहे. आता मतदारांना आकर्षीत करण्यासाठी सातबारा नावावर लावून देण्याच्या गोष्टी महाजन दाम्पत्य करीत आहेत. महाजन दाम्पत्याची ही जुमलेबाजी लोकांना चांगलीच ठाऊक आहे, अशी घणाघाती टीका प्रभाग 14 अ मधील उमेदवार अशोक लाडवंजारी यांनी केली.

तांबापूर मेहरून परिसरातील गावठाणची जागा ताब्यात राहिली असती तर या ठिकाणी एखादी व्यायाम शाळा, वाचनालय वा स्वातंत्र्य सैनिक अब्दुल हमीद स्मारक करता आले असते; पण महाजन दांपत्याने असे न करता महापालिकेची भंगार पाईप लाईनची चोरी करून मोठ्या प्रमाणात पैसा जमावला, असेही लाडवंजारी यांनी सांगतिले.

बंटी-बबली आंदोलन करणारेच त्यांच्या प्रचाराला

मनपाच्या पाईपलाईन चोरीच्या विषयावरून भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी आवाज उठून “बंटी-बबली चोर है..” असे भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्याच भाजपने सुनील महाजन यांना उमेदवारी दिली आहे. आता तेच प्रभाग 14 मधून पुन्हा उमेदवारी करीत आहेत आणि मतदारांची या प्रभागातून दिशाभूल करीत असून सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्याचे गाजर दाखवत आहेत. मात्र जनता सुज्ञ आहे , अशा आश्वासनांना यंदाच्या निवडणुकीत जनता बळी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत अशा उमेदवारांना मतदारराजा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे मत अशोक लाडवंजारी यांनी व्यक्त केले.

सुनील महाजनांना आव्हान


महाजन दांपत्य महापौर व विरोधी पक्षनेतेपद एकाच वेळी घरात असताना तांबापुर परिसरातील लोकांना साधे घरकुल योजनेतील 2 लाख 40 हजार रुपये मिळवून देता आले नाही. महाजन दाम्पत्य मतदारांची दिशाभूल करीत आहे. मतदार या आमिषाला बळी पडणार नाही तांबापूर येथील नागरिकांच्या नावावर सातबारा लावायचा असता तर महापौर पद असताना मोठा अधिकार होता. तेव्हा लावता आले नाही आणि आता हे काय नागरिकांच्या नावावर सातबारा नावावर लावून देतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुमलेबाजी महाजन दापत्याकडून सुरू आहे. या जुमलेबाजीला मतदार बळी पडणार नाही.

मेहरूनमध्ये घाडग्याचा तलाव म्हणून गावठाण जागा होती. अशा ठिकाणी माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी खडे प्लॉट पाडून काही लोकांकडून 50 टक्के रक्कम देखील घेतलेली आहे. त्या लोकांच्या नावावर आधी सातबारा उतारा लावून द्यावा. मग तांबापूर परिसरातील लोकांना सातबारा नावावर लावून देण्याच्या गोष्टी कराव्या, असे खुले आव्हान देखील माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी सुनील महाजन यांना दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment