जळगाव : कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाळीसगावच्या कन्नड घाटात घडली. तर चार जण गंभीर झाले असून, त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील सात मित्र ग्रुपने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे देव दर्शनासाठी जात होते. दरम्यान, चाळीसगावच्या कन्नड घाटात कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले.
कारवरील नियंत्रण सुटले अन् घडला भीषण अपघात
कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असून, मृत तरुणांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या अपघातासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.









