जळगाव : नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांना गुरुवारी शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, दोघांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दि. 7 जानेवारी रोजी दुपारी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना शनिपेठ हद्दीत नायलॉन मांजाची चोरटी विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
रितांशू नरेंद्र चौधरी (रा. ओक मंगल कार्यालयाच्या मागे, शनिपेठ) व आलोक ज्ञानेश्वर भौसले (रा. रिघूरवाडा, जळगाव) यांच्यावर छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.









