जळगाव : पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकणी जळगावात आणखी तीन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय चत्रभुज सोनवणे, किशोर (श्रीकृष्ण) गोविंदा वाघ व देवयानी सुभाष चौधरी यांचा समावेश असून, त्यांच्यावर पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याच्या आरोप करण्यात आला आहे.
याआधी 27 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हकालपट्टी
याआधी संगीता गोकुळ पाटील, हर्षदा अमोल सांगोरे, धनश्री गणेश बाविस्कर, गणेश दत्तात्रय बाविस्कर, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, प्रमोद शांताराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेेंद्र बागरे, चेतना किशोर चौधरी, मयुर श्रावण बारी, तृप्ती पांडुरंग पाटील, सुनील ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील, गिरीष कैलास भोळे, कैलास बुधा पाटील, हेमंत सुभाष भंगाळे, जितेेंद्र भगवान मराठे, प्रिया विनय केसवानी, रुपाली स्वप्नील चौधरी, अंजू योगेश निंबाळकर, मयुरी जितेेंद्र चौथे, जयश्री गजानन वंजारी, ज्योती विठ्ठल पाटील, उज्वला संजय घुगे, दिनेश मधुकर ढाकणे, कोळीळा प्रमोद मोरे या 27 पदाधिकारी आणि कार्यकर्र्त्यांची हाकलपट्टी करण्यात आली होती.
पक्षविरोधी कारवाईचा ठपका
संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपचे प्राथमिक सदस्य असताना पक्षाचे धोरण, आदेश व निर्णयांचे पालन करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले. याबाबत पक्षाच्या अधिकृत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षहित व संघटनात्मक शिस्त लक्षात घेता संबंधित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्राथमिक सदस्यत्व तसेच त्यांनी सध्या भूषवलेली सर्व पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रसिद्ध पत्रिकाद्वारे देण्यात आली.









