होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

नंदुरबारात माजी आमदारांसह ९ जणांवर गुन्हा, काय प्रकरण?

On: January 13, 2026 5:44 AM
Follow Us:
---Advertisement---

नंदुरबार : उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहरातील जळका बाजार परिसरातून निघालेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान महिलेचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह नवनियुक्त उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरींसह ९ जणांविरोधात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील महिला पतीसह १० जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता जळका बाजार परिसरातून जात होती. यावेळी नंदुरबार नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पदावर निवड झालेल्या प्रथमेश चौधरी यांची विजयी मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीदरम्यान पीडित महिलेला संशयितांनी जातिवाचक शिवीगाळ करून साडीचा पदर खेचला होता.

याप्रकरणी महिलेने रविवारी दुपारी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी (५०), उपनगराध्यक्ष प्रथमेश शिरीष चौधरी (२२), रवींद्र हिरालाल चौधरी (५५), नगरसेवक गौरव प्रकाश चौधरी (२५), प्रशांत कन्हैयालाल चौधरी, लकी दीपक चौधरी, सागर कृष्णा चौधरी, गौरव नरेंद्र चौधरी (२५), संकेत चौधरी (२२, सर्व रा. तेलीवाड, नंदुरबार) यांच्याविरोधात जातिवाचक शिवीगाळ करण्यासह विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment