नंदुरबार : दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्राणघातक इंजेक्शन्स बनवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. छाप्यादरम्यान पोलिसांनी अंदाजे ₹२०.२० लाख किमतीचे बेकायदेशीर रसायने जप्त केली असून, दोन संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांच्या सूत्रानुसार, गायी आणि म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी बंदी घातलेल्या आणि विषारी रसायनांचा वापर करून इंजेक्शन्स तयार केले जात होते. हे केवळ प्राण्यांसाठीच नाही तर मानवी आरोग्यासाठीदेखील अत्यंत हानिकारक आणि घातक ठरू शकते.
या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक श्रावण दत्त एस. यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाअसून, पुढील तपास केला जात आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर पोलिसांनी ही कारवाई केली. यात पोलिसांनी अंदाजे ₹२०.२० लाख किमतीचे बेकायदेशीर रसायने जप्त केली असून, दोन संशयितांना अटक केली आहे.











