होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावात होणार हिंदू राष्ट्र जागृती सभा; जाणून घ्या कधी अन् कुठे?

On: January 21, 2026 12:01 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : हिंदूवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी व हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी हिंदु जनजागृती समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने रविवारी (दि. १ फेब्रुवारी २०२६ ) मानराज पार्क जवळ, श्रीराम मंदिर संस्थान येथे हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीतर्फे देण्यात आली. सर्व हिंदूंनी तन-मन-धन यांचा त्याग करून यात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

पद्मावती मंगल कार्यालयात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्यांच्या आयोजित बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प जळकेकर महाराज, ह.भ.प. विक्रम महाराज, ह.भ.प. वरसाडेकर महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक संत सद्गुरु श्री नंदकुमार जाधव, नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. वीरेंद्र खडके आदी उपस्थित होते.

सद्गुरु नंदकुमार जाधव, ह.भ.प. जळकेकर महाराज, ह.भ. प. वडसाडेकर महाराज, ह.भ.प. विक्रम महाराज यांनी सर्व हिंदूंनी या सभेत उपस्थित राहून आपले धर्म कर्तव्य बजवावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन गजानन तांबट यांनी केले.

30 जानेवारीला वाहन फेरी

सभेच्या प्रसारासाठी शुक्रवारी (दि. 30 जानेवारी) दुपारी 4 ते 6 या वेळेत वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या मैदानापासून फेरीला सुरुवात होऊन पिंप्राळा, खोटे नगर, भोईटे नगर, प्रेम नगर या भागातून फेरी जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment