होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Army Soldiers Accident : सैन्याचे कॅस्पर खोल दरीत कोसळले; १० जवानांचा मृत्यू

On: January 22, 2026 10:46 AM
Follow Us:
---Advertisement---

Army Soldiers Accident : जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये सैन्य दलाचे कॅस्पर खोल दरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जवानांचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी (दि. २२ जानेवारी) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग ४४ वर घडली. दरम्यान, या वाहनात एकूण १७ सैनिक असल्याची माहिती समोर आली असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे दलाच्या सूत्रांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील दोडा येथील खन्निटॉप भागात सैन्यांना घेऊन जाणारे कॅस्पर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळले. या वाहनात एकूण १७ सैनिक होते, त्यापैकी १० जवानांचा मृत्यू झाला असून, तीन सैनिकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे दलाच्या सूत्रांनी सांगितले.

नऊ महिन्यांपूर्वी अपघातात तीन सैनिकांचा मृत्यू

नऊ महिन्यांपूर्वी (४ मे २०२५) जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचे एक वाहन ६०० मीटर खोल दरीत कोसळले होते. या अपघातात तीन सैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment