होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धक्कादायक! जळगाव तालुक्यात हाणामारीत तरुणाचा मृत्यू, घटनेने परिसरात भीतीचे वातावरण

On: January 23, 2026 4:39 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील जुना मारुती मंदिर परिसरात गुरुवारी (दि. २२ जानेवारी) रात्री दोन व्यक्तींमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. या घटनेत सागर अरुण बिन्हाडे (वय ३२, रा. आव्हाणे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२ जानेवारी) रात्री जुना मारुती मंदिर परिसरात सागर बिन्हाडे आणि एका तरुणामध्ये किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

यावेळी संशयित आरोपीने सागरला ढकलले. त्यात त्याच्या डोक्यावर जोरदार मार लागल्याने तो जागेवरच कोसळला. त्यानंतर संशयित आरोपीने तातडीने घटनास्थळावरून पळ काढला.

हाणामारीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील सागरला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मयत सागरच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment