होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Chopda Accident News: चोपडा-विरवाडा रस्त्यावर कारचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार, तर 3 गंभीर

On: February 16, 2026 12:44 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Accident News : चोपडा-विरवाडा रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून अपघातात अर्टिका कार दुभाजकावर आदळलीय. भीषण अशा या अपघातात अर्टिका गाडीचा अक्षरशः चक्काचूर होत दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहे. घटनेची माहितीमिळताच घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले.

याबाबात माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने अर्टिका कार क्रमांक एम.एच. 19, बी.एस. 1008 ही 16 फेब्रुवारी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास येत होती. दरम्यान, भरधाव वेगात असलेली ही कार दुभाजकावर आदळल्याने हा भीषण अपघात झालाय. या अपघातात राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत हे दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बंटी रविंद्र कोळी, राकेश भगवान राजपूत (गिरासे) आणि विजय अमृत भोई यांचा समावेश आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजक वर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment