Vastu Shastra : आयुष्यात खूप वेळा अपयश आलं की आपण सहज नशिबाला दोष देतो. ”आपलं नशीबच खराब आहे” असं म्हणत पुढे निघून जातो. पण वास्तुशात्रानुसार केवळ नशिबामुळेच नव्हे, तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या काही वस्तूंमुळेही नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. घरातील वस्तू स्वच्छ, नीट आणि सुस्थितीत असतील तर त्या सकारात्मक ऊर्जा देतात. मात्र, तुटलेल्या, खराब वा निरुपयोगी वस्तू नकारात्मक ऊर्जेचं केंद्र बनतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक शांततेवर, आरोग्यवर आणि प्रगतीवर होतो. या पार्श्वभूमीवर या लेखात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगत, जाणून घेऊया.
फाटलेले वा फार जुने कपडे
वास्तुशास्त्रानुसार, घरात फाटलेले वा फार जुने कपडे ठेवणं अशुभ मानलं जातं. अशा कपड्यांमुळे भाग्य थांबतं. तुटलेल्या काचेच्या वस्तू दुर्भाग्याचं प्रतीक मानल्या जातात, त्या घरात ताणतणाव वाढवतात. तुटलेल्या चपला दारिद्र्याचं लक्षण समजल्या जातात, त्यामुळे त्या त्वरित काढून टाकाव्यात.
सुकलेली झाडं
घरात वा घराबाहेर असलेली सुकलेली झाडं सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अडवतात. त्याचप्रमाणे गंजलेली वा न वापरात असलेली बंद टाळी प्रगतीच्या संधी बंद होण्याचं प्रतीक मानली जातात.
तुटलेल्या मूर्ती
देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवणं वास्तुदोष निर्माण करतं, म्हणून अशा मूर्ती योग्य पद्धतीने विसर्जित कराव्यात. तसेच बंद घड्याळ म्हणजे थांबलेली वेळ, जी आयुष्यात अडथळे आणते.
अशा वस्तू काढून टाकणं
घरात सकारात्मकता हवी असेल, तर वेळोवेळी अशा वस्तू काढून टाकणं आणि घर स्वच्छ, प्रसन्न ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. छोटीशी काळजीही तुमचं नशीब बदलू शकते.
( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोत आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )








