Carbon Krishi Launch : शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. ऑरी ग्रो इंडिया लिमिटेडने AI-आधारित कार्बन क्रेडिट अॅग्रीटेक प्लॅटफॉर्म ‘CarbonKrishi’ लॉन्च केले आहे. या उपक्रमातून सुमारे 1 लाख शेतकऱ्यांना प्लॅटफॉर्मशी जोडण्याचे उद्दिष्ट असून, यामुळे दरवर्षी 16 ते 50 कोटी रुपयांपर्यंत कार्बन क्रेडिट मूल्यनिर्मितीची शक्यता आहे.
ऑरी ग्रो इंडिया लिमिटेडने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘CarbonKrishi’ या AI- Artificial Intelligence आधारित कार्बन क्रेडिट प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. या उपक्रमाद्वारे कंपनीने वेगाने वाढणाऱ्या कार्बन क्रेडिट आणि ESG (Environment, Social, and Governance) परिसंस्थेत धोरणात्मक प्रवेश केला आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार
‘CarbonKrishi’ उपक्रमांतर्गत कंपनीचे साधारण 1 लाख शेतकऱ्यांना प्लॅटफॉर्मवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे दरवर्षी सुमारे 16 ते 50 कोटी रुपयांचे कार्बन क्रेडिट मूल्य निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्बन क्रेडिटच्या या प्रक्रियेतून कंपनीला वार्षिक 3 ते 10 कोटी रुपयांचा संभाव्य महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.
हाँगकाँगच्या कंपनीकडून मोठ्या गुंतवणुकीचा प्रस्ताव
औरी ग्रो इंडियाने हाँगकाँगस्थित विदेशी संस्थागत गुंतवणूकदार ल्युमिनरी क्राउन लिमिटेड यांचा धोरणात्मक प्रस्ताव तत्त्वतः स्वीकारला आहे. ल्युमिनरी क्राउन कंपनीमध्ये 24 टक्के हिस्सा खरेदी करण्यास उत्सुक आहे. ही गुंतवणूक 2 रुपये प्रति शेअर या किमतीने प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे, 6 जानेवारी रोजी शेअरची बाजार किंमत 0.75 रुपये असताना, हाँगकाँगच्या कंपनीने प्रीमियम किमतीवर गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.
‘शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न
CarbonKrishi च्या माध्यमातून भारतीय शेतीला जागतिक कार्बन क्रेडिट परिसंस्थेशी जोडण्याचे आमचे ध्येय आहे. यामुळे शेतकऱ्यांना हवामान-अनुकूल शेती पद्धती स्वीकारून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास मदत होईल,असे ऑरी ग्रो इंडिया लिमिटेडचे संचालक प्रतीक कुमार पटेल यांनी सांगितले आहे.
वित्तीय कामगिरीत 10 पट वाढ
वित्त वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने नेत्रदीपक प्रगती केली आहे. विक्रीत गेल्या वर्षीच्या 16.76 कोटींच्या तुलनेत 10 पट वाढ झाली आहे. विक्री 175.55 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीला एकूण 7.17 कोटी रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या 51 लाख रुपयांच्या तुलनेत नफ्यात मोठी वाढ झाली आहे.











