होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ajit Pawar Death : अजितदादांचा घात की अपघात? राष्ट्रवादी नेत्याचे 5 खळबळजनक सवाल

On: February 2, 2026 1:47 PM
Follow Us:
---Advertisement---

Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या निधनानंतर अजित पवार यांचा घात की अपघात असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे अमोल मिटकरी यांनी दुःख व्यक्त करत खळबळजनक पाच प्रश्न उपस्थित केले आहे. अमोल मिटकरी यांचे हे सवाल संशयास्पद बाबींकडे सर्वांचं लक्ष वेधत आहे.

अजितदादा पावर यांच्या अपघाती निधनामुळे राज्य दुखःच्या सागरात बुडाले आहे. त्यात गेल्या 4-5 दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी देखील घडल्या आहे. अशात दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात अमोल मिटकरी यांनी काही खळबजनक प्रश्न उपस्थित केले आहे.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफार्म एक्सवर एक ट्विट करत काही फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्ट सोबत त्यांनी दादांसोबतच्या आठवणींना देखील उजाळा देत दाद गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही… असं म्हणत अमोल मिटकरी म्हणाले, मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय..

अमोल मिटकरी यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय आहे अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले खळबळजनक प्रश्न?

  • Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
  • एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
  • अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
  • सहावी व्यक्ती कुठे गेली?
  • एकादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही?

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.
आणि दुसरी – आदरणीय दादांची!!

मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच…

pic.twitter.com/vkASj7gxVC

— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 1, 2026

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment