होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Mayor Reservation : जळगावात महिला होणार महापौर, आरक्षण सोडत जाहीर!

On: January 22, 2026 8:16 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Mayor Reservation : जळगावसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाले. जळगाव महापालिकेचे महापौरपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव निघाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

महापौर पदासाठी संभाव्य नावे

भाजपकडून उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, गायत्री राणे, माधुरी बारी, विदया सोनवणे, जयश्री सुनील महाजन ही संभाव्य नावे चर्चेत आहे. मात्र, भाजप कुणाला संधी देतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण ?

जळगाव – ओबीसी (महिला)
कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती
ठाणे – अनुसूचित जाती
जालना – अनुसूचित जाती (महिला)
लातूर – अनुसूचित जाती (महिला)
इचलकरंजी – ओबीसी
पनवेल – ओबीसी
अहिल्यानगर – ओबीसी (महिला)
अकोला – ओबीसी (महिला)
उल्हासनगर – ओबीसी
कोल्हापूर – ओबीसी
चंद्रपूर – ओबीसी (महिला)
मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
पुणे – खुला प्रवर्ग (महिला)
छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)
धुळे – खुला प्रवर्ग (महिला)
अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)
भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग (महिला)
मालेगाव – खुला प्रवर्ग
मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग
नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)
पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग (महिला)
नाशिक – खुला प्रवर्ग
नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
परभणी – खुला प्रवर्ग (महिला)
सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
वसई-विरार – खुला प्रवर्ग
सोलापूर – खुला प्रवर्ग

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment