होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Amrit Bharat Express in Jalgaon : खुशखबर! जळगावमार्गे आणखी एक ‘अमृत भारत एक्सप्रेस’ची भेट

On: January 24, 2026 8:47 AM
Follow Us:
---Advertisement---

Amrit Bharat Express in Jalgaon : जळगाव व भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मंत्रालयाने आणखी एक नवीन पनवेल-अलीपूरद्वार अमृत भारत एक्सप्रेस (DN-11031 / UP-11032) सुरु केली आहे. या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

ही नवी अमृत भारत एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी ११.५० वाजता पनवेल जक्शन येथून सुटून बुधवारी दुपारी १.५० वाजता अलीपूरद्वार जंक्शन येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 11032 ही गाडी दर गुरुवारी पहाटे ४.४५ वाजता अलीपूरद्वार जंक्शन येथून सुटून शनिवारी पहाटे ५.३० वाजता पनवेल जन्क्शन येथे दाखल होणार आहे.

या अमृत भारत एक्सप्रेसला कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटानी, सटाणा, माणिकपूर, प्रयागराज छेवकी, मिरझापूर, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आर, दानापूर, पाटलीपुत्र, सोनापूर, हाजीपूर यांसारख्या अनेक महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

यामुळे जळगाव- भुसावळ परिसरातून थेट उत्तर व ईशान्य भारतात जाणे अधिक सोयीचे होणार आहे. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार तसेच पर्यकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, जिल्ह्याच्या रेल्वे कनेक्टीव्हीटीला यामुळे नवी गती मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment