होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ajit Pawar : अजित पवारांचा शेवटचा फोन, विमानातून केले संभाषण, समोर आला ‘ऑडिओ’

On: February 4, 2026 11:26 AM
Follow Us:
---Advertisement---

Ajit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातापूर्वी, त्यांचे पुतणे श्रीजित पवार यांच्याशी फोनवर बोलले. ती ऑडिओ क्लिप बारामती पक्ष कार्यालयात ऐकवण्यात आली. ती ऐकताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काटेवाडी येथील रहिवासी श्रीजित पवार यांच्याशी झालेल्या या संभाषणातून हे स्पष्ट होते की, ते शेवटपर्यंत सर्व जाती-समुदायांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर ठाम राहिले. समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणण्याची त्यांची दूरदृष्टी आणि वचनबद्धता शेवटपर्यंत अबाधित राहिली.

शेवटच्या कॉलमध्ये नेमकं काय बोलले?

आपण त्यांचा ऑडिओ येथे शेअर करू शकत नाही, परंतु त्यात काय बोलले होते, हे जाणून घेऊ. अजित पवार त्यांच्या पुतण्याला म्हणतात, ”अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांना अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलं आहे.

तुम्हाला अनेकदा वस्तुस्थिती माहिती नसते, तुम्ही काहीही बोलता. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, हे लक्षात घे.

श्रीजित पवार उत्तर देतात, “नाही, मी तुम्हाला जे माहित होते ते सांगितले, दादा.”

पुढे अजित पवार उत्तर देतात, तुझं म्हणणं मान्य आहे, पण वस्तुस्थिती समजून घे. आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून मी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही, पण आपण समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय.

श्रीजित पवार : ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम निर्णय आहे, मी फोन ठेवतो. धन्यवाद!

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment