Bhusawal News : भुसावळ शहरात वाढते ध्वनीप्रदूषण व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न लक्षात घेऊन रात्री १० नंतर डीजे, मोठ्या आवाजातील वाद्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी विशेष पोलीस कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती भुसावळ पोलिसांनी दिली.
15 संशयितांवर हद्दपार व एमपीडीए…
शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता हद्दपार तसेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा) अंतर्गत कठोर कारवाईचा नवा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. भुसावळ शहर पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील वारंवार गुन्हे करणाऱ्या 15 संशयितांवर हद्दपार व एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू आहे.
…तर कडक कारवाई
पोलिसांनी संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील गुन्हेगारांची सविस्तर कुंडली तयार केली जात असून, त्यांच्या गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार कोणावर हद्दपार व कोणाविरुद्ध एमपीडीएची कारवाई करायची, याचे नियोजन केले जात आहे.
येत्या आठवडाभरात शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यांकडून हे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील संशयितांची नावे समाविष्ट करण्याचे काम क्राईम विभागाकडून सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
(भुसावळ विभागातील बातम्या तसेच जाहिरातींसाठी संतोष माळी- मो. क्रं. 9673151726, 8830123557 यांच्याशी साधावा.)








