होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

DMC Election Results 2026 : धुळे महापालिकेत भाजपला अभूतपूर्व यश; आमदारांच्या संपर्क कार्यालयात विजयोत्सव

On: January 17, 2026 5:04 AM
Follow Us:
---Advertisement---

धुळे : धुळे महापालिकेत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत सत्ता काबीज केली आहे. अपवाद वगळता भाजपचे बहुतांश उमेदवारांच्या गळ्यात धुळेकरांनी विजयाची माळ घातल्याने आमदार अनुप अग्रवाल यांच्या येथील मालेगाव रोडवरील जनसंपर्क कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. जय श्रीरामचा जयघोष आणि गुलालची उधळण करत कार्यकर्त्यांनी आमदार कार्यालयात नृत्याचा ठेका धरल्याने वातावरण अक्षरशः भगवामय झाले होते.

येथील महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी दहापासून प्रारंभ झाला. पहिल्या दीड-दोन तासांतच निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागल्याने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष सुरू झाला होता. येथील आमदार अनुपभय्यांच्या कार्यालयात आज सकाळपासूनच आमदार अग्रवाल यांच्यासह माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जसजसा एकेक प्रभागाचा निकाल जाहीर होत होता, तसा सर्वांकडून जल्लोष करण्यात येत होता. तसेच अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या विजयी उमेदवारांसह त्यांचे समर्थक, कार्यकर्ते मतमोजणी केंद्रापासून थेट आमदार अनुपभय्यांच्या कार्यालयात मिरवणुकीने पोहोचत होते. तेथे आल्यानंतर आमदार अनुपभय्यांसह विजयी उमेदवारांना खांद्यावर घेत समर्थकांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला.

यामध्ये भगव्या गुलालाची उधळण करण्यात येत असल्याने संपूर्ण कार्यालय परिसर भगवामय झाला होता. सोबतीला जय श्रीरामच्या गीतांसह ढोल-ताशांच्या गजरात नृत्याचा ठेका धरत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. दुपारी उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता. संपूर्ण आमदार कार्यालय भगव्या गुलालाने माखून गेले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment