होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भुसावळ नगरपरिषदेच्या दप्तर स्थलांतरावरून भाजप आक्रमक, उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन

On: January 19, 2026 1:03 PM
Follow Us:
---Advertisement---

भुसावळ : येथील नगरपरिषदेच्या विद्यमान दप्तर आणि कारभाराला संत गाडगेबाबा रूग्णालयात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सोमवारी (दि. १९ जानेवारी) उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी तोडकाम थांबवण्याचे निर्देश दिले असून, अधिक चर्चेसाठी मुख्याधिकारी फातले थेट जिल्हाधिकारी कार्यलयाकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

भुसावळ नगरपरिषदेच्या विद्यमान दप्तर आणि कारभाराला संत गाडगेबाबा रूग्णालयात स्थलांतरित करण्याच्या निणर्य नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नुकताच घेतला. या निर्णयाविरोधात भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी पत्रकार परिषद घेत विरोध नोंदविला.

भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सोमवारी (दि. १९ जानेवारी) उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, तोडकाम आणि रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामाची तात्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी तोंडी आदेश दिले. मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी रुग्णालयात भेट देऊन संबंधित तोडकाम थांबवण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, अधिक चर्चेसाठी मुख्याधिकारी राजेंद्र फातले थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले असून, येत्या काही तासांत अधिकृत निर्णयाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

नागरिक अन् रुग्णांच्या हिताचा विचार करा

“रुग्णालय हे रुग्णांसाठी आहे, नगरपरिषदेच्या दप्तरासाठी नाही. कोंडवाड्यात रुग्णांना पाठवणार का?” असा प्रश्न उपस्थित करीत नागरिक आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment