जळगाव : घरफोडी करून साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
टी.एम. नगर येथील एका घरात घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी नळ फिटिंग आणि लाइट फिटिंगचे महागडे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिस मास्टर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या विशेष पथकाने घटनास्थळासह विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीनुसार, कॉलनीतील सय्यद उबेद सय्यद रफिक पटवे (१९) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले.
अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात त्याच्यासोबत एक विधिसंघर्षित बालक सामील असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी सय्यद उबेद याच्याकडून चोरीला गेलेले २८००० रुपये किमतीचे नळ फिटिंग आणि लाइट फिटिंगचे साहित्य जप्त केले आहे.









