होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात सीए अभ्यासिकेचे  उद्घाटन

On: March 4, 2026 3:05 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusawal News: भुसावळातील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए, सीएस, सीएमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीए अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयातील डी-53 या वर्गात नामदार संजय सावकारे, सीए.अर्पित काबरा (सी.सी.एम.आय, सी.ए. आय, न्यू दिल्ली) यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार डॉ. मोहनजी फालक होते तर प्रमुख उपस्थिती सीए. हितेश आगीवाल (चेअरमन डब्ल्यू आयआरसी जळगाव), सीए मुकेशजी अग्रवाल (भुसावळ), महेशजी फालक (चेअरमन ताप्ती एज्युकेशन सोसायटी), विष्णूजी चौधरी (सचिव ताप्ती एज्युकेशन सोसायटी), संजयजी नाहाटा (कोषाध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. बऱ्हाटे,  उपप्राचार्य डॉ. दीपक पाटील उपप्राचार्य तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. जी.आर. वाणी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय.एम. पाटील, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील यांची होती.

यावेळी उद्घाटक नामदार संजय सावकारे यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांना  सीए व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा आणि  ICAI या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या वाचनालयाचा लाभ  घेण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सीए हे, उद्योजकांना व्यवसायिकांना व प्रत्येक उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वाचे आहे. उत्पन्नाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक संपत्तीचे नियोजन, कर नियोजन इत्यादीसाठी समाजात सीए यांचे  मार्गदर्शन हे महत्वाचे ठरते.

यानंतर अध्यक्षीय मनोगतात, डॉ. मोहन फालक म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांचे नेहमीच सहकार्य महाविद्यालयास असते, माजी विद्यार्थ्यांचे कार्य हे कौतुकास्पद असून त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे त्यासाठी त्यांना आमच्या ताप्ती एज्युकेशन सोसायटीची काही मदत लागल्यास आम्ही आपणास नक्कीच देऊ असे आश्वासन दिले.

ही अभ्यासिका आय सी ए आय,न्यू दिल्ली जळगाव शाखा यांच्या सौजन्याने माजी विद्यार्थी संघटनेस मिळाली असून अशा प्रकारची अभ्यासिका नाहाटा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेस मिळावी म्हणून नाहाटा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भुसावळचे सुप्रसिद्ध सीए मुकेशजी अग्रवाल यांचे विशेष अनमोल असे योगदान आहे. येत्या 19 तारखेपासून ही अभ्यासिका सीए, सीएस, सीएमए च्या विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव उपप्राचार्य डॉ. जी.आर. वाणी यांनी तर सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघटनेचे सहसचिव डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी आणि आभार उपप्राचार्य डॉ. दीपक पाटील यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment