Reserve Bank of India : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थात कर्जवसुली प्रक्रियेत महत्त्वाचे बदल सुचवले असून, अलीकडेच जाहीर केलेल्या दुसऱ्या दुरुस्ती निर्देशांच्या मसुद्यात वसुली प्रक्रिया अधिक पारदर्शक, जबाबदार आणि ग्राहकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे. या नियमांमुळे कर्जदारांचा मानसिक ताण कमी होऊन बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवीन तरतुदीनुसार प्रत्येक बँकेला स्पष्ट आणि लेखी वसुली धोरण तयार करणे बंधनकारक असेल. हप्ते भरण्यात अडचण येणाऱ्या कर्जदारांची ओळख करून त्यांचे समुपदेशन करणे आणि पर्यायी उपाय सुचवणे ही बँकांची जबाबदारी असेल. तसेच अधिकृत वसुली एजंट्सची यादी बँकांनी आपल्या वेबसाइट, अॅप आणि शाखांमध्ये जाहीर करावी लागेल. ग्राहकाची तक्रार प्रलंबित असल्यास ती निकाली निघेपर्यंत प्रकरण वसुली एजंटकडे पाठवता येणार नाही.
वसुली एजंट्ससाठीही कडक नियम
वसुली एजंट्ससाठीही कडक नियम ठरवण्यात आले आहेत. सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच संपर्क साधता येईल. नातेवाईक, मित्र किंवा सहकाऱ्यांना त्रास देणे मनाई असेल. संवेदनशील प्रसंगी संपर्क टाळावा लागेल. प्रत्येक व्यवहारानंतर पावती देणे बंधनकारक राहील, तसेच कॉलची नोंद आणि संभाषणाची रेकॉर्डिंग ठेवावी लागेल.
दबाव टाकण्यावर बंदी
धमक्या, अपशब्द किंवा सोशल मीडियाद्वारे दबाव टाकणे यावर स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. या नियमांमुळे कर्जदारांचा मानसिक ताण कमी होऊन बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)








