होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Chopada News: चोपडा नगरपालिका सभापतींची निवड बिनविरोध..

On: January 20, 2026 7:45 AM
Follow Us:
---Advertisement---

Chopada News: चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी समिती आणि विषय समित्यांची  सभापती पदांची निवड पार पडली. पीठासन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रीया पार पडली. या स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष नम्रता सचिन पाटील यांची तर बांधकाम समिती सभापती पदी हुसेन खाँ अय्युब खॉं पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच इतर समिती सभापतींची ही निवड घोषित करण्यात आली.  

पीठासन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सुरुवातीला पीठासीन अधिकाऱ्यांकडे स्थायी व विशेष समिती सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. प्रत्येक सभापती पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. यात स्थायी समिती सभापतीपदी नम्रता सचिन पाटील तर बांधकाम सभापतीपदी हुसेन खाँ अय्युब खाँ पठाण, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी अमोल साहेबराव पाटील, स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समिती सभापतीपदी रमेश ग्यानोबा  शिंदे, पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती सभापतीपदी किशोर रघुनाथ चौधरी, नियोजन व विकास समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष पंकज सुरेश बोरोले आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी देवयानी पवन माळी यांची  निवड करण्यात आली आहे.

यावेळी नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील, उपाध्यक्ष पंकज सुरेश बोरोले, गटनेता योगेश उर्फ पियुष राजेंद्र चौधरी, गटनेते रमाकांत नथू ठाकूर, गटनेते गजेंद्र अरविंद जैस्वाल, हितेंद्र रमेश देशमुख यांच्यासह मुख्याधिकारी रामनिवास झवंर, उप मुख्याधिकारी संजय मिसर, सभा अधीक्षक संजय ढमाळ, अनिल चौधरी तसेच सर्व विभाग प्रमुख व नगरसेवक हजर होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment