होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Mayor : जळगावच्या नव्या प्रथम नागरिक दीपमाला काळे; बिनविरोध निवड

On: February 7, 2026 4:25 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Mayor : जळगाव महानगरपालिकेच्या सतराव्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. महापालिका सभागृहात झालेल्या विशेष सभेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते.

जळगाव महापालिकेचा कार्यकाळ 17 सप्टेंबर 2023 रोजी संपुष्टात आल्याने, महापालिकेवर प्रशासक राज लागू झाले होते. अखेर तब्बल 28 महिने 19 दिवसानंतर पुन्हा एकदा लोकनियुक्त पदाधिकारी महापालिकेचे सूत्रे हाती घेणार आहेत.

जळगाव महापालिकेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एकूण 16 महापौर झाले असून, त्यामध्ये 8 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. दीपमाला काळे या जळगावच्या नवव्या महिला महापौर ठरल्या आहेत.

आतापर्यंतचे महापौर

आशाताई दिलीप कोल्हे, तनुजा अजित तडवी, रमेशदादा भिकमचंद जैन, प्रदीप ग्यानचंद रायसोनी, अशोक काशिनाथ सपकाळे, सदाशिव गणपत ढेकळे, विष्णू रामदास भंगाळे, जयश्री अशोक धांडे, किशोर काशिनाथ पाटील, राखी शामकांत सोनवणे, नितीन बालमुकुंद लढ्ढा, ललित विजय कोल्हे, गणेश बुधो सोनवणे, सीमा सुरेश भोळे, भारती कैलास सोनवणे, जयश्री सुनील महाजन आणि आता दीपमाला मनोज काळे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment