होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

जळगावातील मतदारांना जिल्हाधिकारी घुगे यांचे आवाहन; जाणून घ्या काय म्हणालेय!

On: January 9, 2026 6:35 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : आगामी महापालिका निवडणुकीत नागरिकांनी कोणत्याही दबावाविना निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

जळगाव महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी आदी उपस्थित होते.

जळगाव महानगरपालिकेसाठी गुरूवार, दि.१५ रोजी मतदान तर शुक्रवार, दि.१६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व जळगाव शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था, शांतता व सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीदरम्यान, निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक सुरक्षा व्यवस्था, विविध यंत्रणांमधील समन्वय तसेच तत्काळ प्रतिसाद यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment