होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

Zilla Parishad Election 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर, ‘या’ तारखेला होणार मतदान

On: January 13, 2026 12:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Zilla Parishad Election 2026 : राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर केल्या आहेत. अर्ज सादर करण्याची तारीख १६ ते २१ जानेवारी असून, अर्जांची छाननी २२ जानेवारीला होईल. ५ फेब्रुवारीला मतदान, तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जागांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांसाठी राज्यभरात २५,४८२ मतदान केंद्रे असून, एकूण मतदारांची संख्या १ कोटी ७० लाख पुरुष आणि १ कोटी ३० लाख महिला आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यक्रम

  • १६ ते २१ जानेवारी दरम्यान उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होईल.
  • उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी दुपारी ३ वाजता आहे.
  • निवडणूक चिन्ह आणि उमेदवारांची अंतिम यादी २७ जानेवारी रोजी दुपारी ३:३० नंतर जाहीर केली जाईल.
  • मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत होईल.
  • मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी होईल.

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागतील. एक जिल्हा परिषदेसाठी आणि एक पंचायत समितीसाठी. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असेल. महानगरपालिकेप्रमाणे, नामांकन प्रक्रियादेखील ऑफलाइन असेल. राखीव जागांसाठी जात प्रमाणपत्रांची पडताळणी अनिवार्य आहे. निवडणुकीच्या सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. असे न केल्यास निवडणूक रद्द केली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment