Paladhi News: तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मराठी माणूस हा नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा झाला पाहिजे, असे प्रेरणादायी विचार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी येथील शासकीय विश्रामगृह येथे जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने भव्य रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी होते. या मेळाव्यास सेंट्रल बँकेचे मॅनेजर डोहरे, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण सिन्हा, बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक सुनील देशमुख, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष दराडे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक दीपक बोरसे, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुण्याचे राजेंद्र कानडे, जिल्हा उद्योग केंद्राचे आर.आर. डोंगरे, इतर मागासवर्गीय महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त श्यामकांत हिरे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, बँक ऑफ बडोद्याचे राहुल गीते, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, महानगर प्रमुख संतोष पाटील यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी व आजी-माजी लोकप्रतिनिधी, जीपीएस मित्र परिवाराचे सदस्य तसेच युवक व महिला बचत गटाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण सिन्हा यांनी, बँका सकारात्मक भूमिकेतून कर्ज प्रकरणे मंजूर करतात. आर्थिक क्षमतेनुसार व्यवसाय निवडावा,असे मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन भूषण माळी यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक समीर भाटिया यांनी केले. आभार उद्योजक तथा जीपीएस ग्रुपचे विक्रम पाटील यांनी मानले.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी, जीपीएस मित्रपरिवार हे उद्योग-व्यवसायासाठी खरे व्यासपीठ आहे. उद्योजक व्हायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायाचा आत्मा म्हणजे चांगला प्रोजेक्ट, असे त्यांनी सांगितले. जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त श्यामकांत हिरे, बँक प्रतिनिधी गजभिये, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुण्याचे राजेंद्र कानडे, माजी सभापती व उद्योजक राजेंद्र चव्हाण व माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उद्योजक गोपाल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात झचएॠझ व उचएॠझ योजनांतर्गत सचिन ज्ञानेश्वर पाटील व उमेश अरुण नंदनवार यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीची पत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.










