होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Dr. Mohan Bhagwat : भाजप सत्तेत आल्याने संघाचे चांगले दिवस आलेत का? डॉ. मोहन भागवत म्हणाले…

On: February 8, 2026 3:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Dr. Mohan Bhagwat : भाजप सत्तेत आल्याने संघाचे चांगले दिवस आले, असे नाही; उलट आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरु झाले, असे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. त्यांनी अयोध्या, राम जन्मभूमी आंदोलनाचा उल्लेख करत लोकांपर्यंत संघाचे विचार पोहचवण्याचे महत्त्व सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या कामगिरीसंबंधी आपले विचार मांडले.

भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का, असा प्रश्न विचारल्यावर डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले की, “भाजप सत्तेत आल्याने संघाचे चांगले दिवस आले, असे नाही; उलट आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरू झाले.” त्यांनी अयोध्या, राम जन्मभूमी आंदोलनाचा उल्लेख करत लोकांपर्यंत संघाचे विचार पोहचवण्याचे महत्त्व सांगितले.

शाखेत कोणतेही राजकारण होत नाही – डॉ. मोहन भागवत

भागवत यांनी सांगितले की संघाचे कार्य राजकारणावर अवलंबून नाही; शाखेत कोणतेही राजकारण होत नाही. “लोकं आमचं ऐकत असतील तर त्यांचा फायदा होतो. भाजपवर आम्ही कोणताही दबाव टाकत नाही, सल्ला हवे असल्यास सर्वांना मिळतो. राजकारणात दबाव मतदारांकडे असतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment