Eknath Shinde : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याचे आजही लाखोंच्या मनात दु:ख आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ वा भेटवस्तू, अभिनंदनपर होर्डिंग्ज, कोणतेही कार्यक्रम वा समारंभ आयोजित करू नका, असे आवाहन केले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “अजित पवारांच्या अकाली निधनाच्या दुःखातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. वैयक्तिकरित्या, मी एक सहकारी आणि मित्र गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे झालेले अपूरणीय नुकसान कधीही भरून निघू शकत नाही. या दुःखाच्या वेळी आम्ही पवार कुटुंबासोबत आहोत.”
त्यांनी पुढे म्हटले की, अशा दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे वा कोणत्याही प्रकारचा उत्सव आयोजित करणे योग्य नाही. सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे व संयम बाळगण्याचे आवाहन केले.
दरम्यान, अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात असताना लँडिंगच्या काही काळापूर्वी त्यांचे विमान कोसळले. अजित पवार यांच्या अकाली जाण्याचे आजही लाखोंच्या मनात दु:ख आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)











