नशिराबाद : येथील एका भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीकडे जेवण मागत शिवीगाळ व अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नराधम पित्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या या घटनेप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आरोपी पित्याने मुलीकडे जेवण मागत शिवीगाळ व अश्लिल वर्तन करीत विनयभंग केला.
मुलीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले, तेव्हा आरोपीने तेथून पळ काढला. याप्रकरणी नराधम पित्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.









