होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ajit Pawar death : महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा; आज शासकीय सुट्टी घोषित

On: January 28, 2026 4:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Ajit Pawar death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांच्या निधनाने महाराष्ट्रावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सरकारने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून, आज बुधवारी (दि. २८ जानेवारी) शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.

दिलदार मित्र गमावला – मुख्यमंत्री फडणवीस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची घटना मनाला अत्यंत व्यथित व चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

अन् काही क्षणात विमानाने घेतला पेट

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती तालुक्यात विविध सभांना संबोधित करणार होते. त्यानुसार ते आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते.

सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला.

बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) पुष्टी केली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment