होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राज्य सरकारचा मोठा निर्णय! हवाई ताफा ‘ऑन ड्युटी’साठी ६ कोटींचा निधी मंजूर

On: January 30, 2026 2:14 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्य सरकारने सरकारी विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांसारख्या तातडीच्या व महत्वाच्या कामांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अर्थात शासनाच्या मालकीच्या हवाई वाहनांच्या देखभाल, दुरुस्ती तसेच आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीनेही यास मान्यता दिली आहे.

जीआरमध्ये काय?

प्रत्येकी तीन कोटी रुपयांच्या दोन पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी मंजूर करण्यात आला असून, तो २७-लहान बांधकामे आणि ५२यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीसाठी खर्च केला जाणार आहे. या निर्णयानुसार लेखाशिर्ष २०७००१५६ अंतर्गत तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी बीम्स प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

या निधीच्या आहरण व वितरणासाठी उपसंचालक, विमानचालन संचालनालय, मुंबई यांची आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संचालक, विमानचालन संचालनालय, मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंजूर निधी हा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ज्या प्रयोजनासाठी मंजूर झाला आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च केला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या खर्चाचा तपशील व उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत शासन व महालेखापाल कार्यालयास सादर करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला असून, तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment