होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावात गॅस सिलिंडर स्फोट; तीन घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

On: February 15, 2026 4:59 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : जुन्या जळगाव भागातील तरुण कुढापा चौक परिसरात रविवारी (१५ रोजी) सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत पीडित कुटुंबांचा संसार उध्वस्त झाला असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.

निलेश शंकर शिरसाट व बापू शंकर शिरसाट यांच्या घरात सकाळी सुमारे दहा वाजता सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आगीच्या ज्वाळांनी शेजारील घरांनाही वेढा घातला. लाकडी पार्टिशनची घरे असल्याने काही मिनिटांतच तिन्ही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घरातील संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. स्वतःचे घर राखरांगोळी झाल्याचे पाहून कुटुंबीयांचा आक्रोश उसळला.

कोणतीही जीवितहानी नाही

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिका अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्ते आणि आगीची तीव्रता यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या; मात्र शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाठपुरावा करण्याचे आश्वासन

घटनेनंतर नगरसेवक पियुष कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांना धीर दिला व शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आगग्रस्तांना तातडीने आर्थिक सहाय्य देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment