होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Health Tips: तुम्हाला तीव्र डोकेदुखीचा त्रास आहे का? मग, दुर्लक्ष करू नका; असू शकतो मेंदूच्या ‘या’ आजाराचे संकेत

On: January 27, 2026 5:46 AM
Follow Us:
---Advertisement---

Health Tips: हल्लीचं जग हे धावपळीचं आहे. धावपळीच्या या जीवनशैलीत व्यक्तीला आरोग्याविषयी अनेक सामन्य समस्या उद्भवतात. त्यातील एक म्हणजे डोकेदुखी. डोकेदुखी ही एक सामान्य समस्या मानली जात असली तरी अनेक वेळा ही समस्या एखाद्या गंभीर आजाराचे संकेत देखील ठरु शकते. डोकेदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे जीवावार देखील बेतू शकते.

याबाबत न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे (दिल्ली) यांच्या मते, ही लक्षणे मेंदूला होणारा कमी रक्तपुरवठा, मेंदूतील रक्तस्त्राव किंवा मेंदूतील गाठ (Tumor) यांसारख्या गंभीर आजारांची चिन्हे असू शकतात. वेळेवर उपचार न केल्यास हा धोका जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे डोकेदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे टाळत त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ही लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध


डोकेदुखी ही समान्य समस्या वाटत असली तरी अनेकवेळा ही समस्या एखाद्या गंभीर अजाराचे संकेत देखील ठरु शकते. त्यामुळे डोकेदुखीसोबत काही लक्षणे जाणवल्यास त्वरित सावध होणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने डोकेदुखीसह सतत अशक्तपणा जाणवणे, तीव्र अंगदुखी होणे, दृष्टी कमकुवत होणे (धूसर दिसणे), वारंवार चक्कर येणे, चेहरा किंवा शरीराच्या इतर अवयवांना मुंग्या येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment