Holi Special Train: होळी सणाच्या पार्श्वभुमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगांव/हटिया, लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव आणि पुणे – दानापूर दरम्यान 18 अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाशांना फायदा होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगांव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष – (4 सेवा)
ट्रेन क्रमांक 01049 विशेष दि. 03 मार्च 2026 आणि 06 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.30 वाजता सुटेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या 2 फेऱ्या होतील.
ट्रेन क्रमांक 01050 विशेष दिनांक 03 मार्च 2026 आणि 06 मार्च 2026 रोजी मडगांव येथून 14.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 05.20 वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या 2 फेऱ्या होतील.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.
संरचना: 18 वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी आणि 2 जनरेटर व्हॅन.
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगांव- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष – (4 सेवा)
ट्रेन क्रमांक 01047 दिनांक 29 फेब्रुवारी 2026 आणि 07 मार्च 2026 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.15 वाजता सुटेल आणि मडगांव येथे दुसऱ्या दिवशी 12.00 वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या 2 फेऱ्या होतील.
ट्रेन क्रमांक 01048 दिनांक 01 मार्च 2026 आणि 08 मार्च 2026 रोजी 18.00 वाजता मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 06.50 वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या 2 फेऱ्या होतील.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड (फक्त 01047 साठी), कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.
संरचना: 1 वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 9 शयनयान, 4 सामान्य द्वितीय, 1 सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष- (4 सेवा)
ट्रेन क्रमांक 08610 विशेष दिनांक 04 मार्च 2026 आणि 11 मार्च 2026 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 5.00 वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी 18.00 वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या 2 फेऱ्या होतील.
ट्रेन क्रमांक 08609 विशेष दिनांक 02 मार्च 2026 आणि 09 मार्च 2026 रोजी हटिया येथून 16.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी 00.40 वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या 2 फेऱ्या होतील.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला.
संरचना: 2 वातानुकूलित द्वितीय, 5 वातानुकूलित तृतीय, 2 वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, 7 शयनयान, 4 सामान्य द्वितीय, 1 सामान्य द्वितीयसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
पुणे-दानापूर-पुणे विशेष (6 सेवा)
ट्रेन क्रमांक 01479 विशेष दिनांक 01 मार्च 2026, 05 मार्च 2026 व 09 मार्च 2026 रोजी पुणे येथून 19.55 वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी 08.00 वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या फेऱ्या होतील.
ट्रेन क्रमांक 01480 विशेष दिनांक 03 मार्च 2026, 07 मार्च 2026 आणि 11 मार्च 2026 रोजी दानापूर येथून 10.00 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 18.15 वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या 3 फेऱ्या होतील.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगांव, मनमाड, जळगांव, भुसावळ, इटारसी, मदन महल, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: 1 वातानुकूलित प्रथम, 1 वातानुकूलित द्वितीय, 1 वातानुकूलित तृतीय, 11 शयनयान, 5 सामान्य द्वितीय आणि 2 सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण सुरु
ट्रेन क्रमांक 01047, 01049 आणि 01479 या विशेष गाड्यांसाठी आरक्षण बुकिंग सुरू आहे आणि ट्रेन क्रमांक 08610 या विशेष गाडीसाठी बुकिंग दि. 02 मार्च 2026 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल.









