होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Horoscope 19 January 2026, राशीभविष्य : सोमवारी जुळून येतोय लक्ष्मी योग, ‘या’ राशींच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

On: January 18, 2026 2:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Horoscope 19 January 2026, राशीभविष्य : ज्योतिष शास्त्रानुसार, सोमवार, 19 जानेवारी 2025 चा दिवस विशेष आहे. करण या दिवसी मकर राशीत चंद्र आणि मंगळाची युती होत लक्ष्मी योग निर्माण होत आहे. चंद्र मनाचे प्रतिनिधित्व करतो, तर मंगळ हा कर्माशी संबंधित ग्रह आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हा योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मकर राशीत या दोन्ही ग्रहांची युती अनेक राशींना फायदेशीर ठरणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील, प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबी यशस्वी होतील. चला तर मग जाणून घेऊया सर्व 12 राशींच्या लोकांसाठी कसा राहील सोमवारचा दिवस.

मेष राशी- मेष राशीचा स्वामी मकर राशीत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी समिश्र फळ देणारा ठरणार आहे. आजचा दिवस विशेष नियोजन करण्यात घालवला जाईल. तुमचा भौतिक आणि सांसारिक दृष्टिकोन आज बदलू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करा. तसेच कुठलेही काम करताना सावधगिरी बाळगा.

वृषभ राशी- वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र मकर राशीत भ्रमण करत आहे. शुक्रची शुभ दृष्टी कर्क राशीकडे असल्याने आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज सन्मान, प्रतिष्ठा आणि संपत्तीत वाढ होईल. नवव्या घरातील चंद्र आनंद आणि शांती घेऊन येईल. आज तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदार मिळतील.

मिथुन राशी- मिथुन राशीचा आजचा दिवस चिंता आणि काळजीने भरलेला असेल. कुटुंबात आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबाची काळजी घ्या, विशेषतः पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. पाहुण्यांचे आगमन होऊ शकते आणि ते जास्त काळ राहण्याची इच्छा बाळगू शकतात.

कर्क राशी – कर्क राशी ही चंद्राची रास आहे. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. आज तुमच्या राशीपासून सातवा असलेला चंद्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभाचे संकेत देत आहे. ज्यामध्ये काही खर्च देखील होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कोणतीही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

सिंह राशी – सिंह राशीचा स्वामी सूर्य, मकर राशीत असल्याने, तुमचे भाग्य वाढवण्यास मदत होईल. बुध अनुकूल असल्याने कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होईल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. तुम्ही तुमच्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकाल. कामात आळस टाळत प्रामाणिकपणे काम करत रहा यश मिळेल.

कन्या राशी- कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप उपयुक्त ठरणार आहे. अनेक लोक तुमच्याकडून मदतीची अपेक्षा बाळगून येतील. त्या सर्वांचा आदर करा. हे लोक भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. तुमचे काम किंवा व्यवसायाच्या ठिकाणी शांत राहणे आज फायदेशीर ठरेल. वादविवाद आणि संघर्ष टाळा.

तूळ राशी- तूळ राशीचा स्वामी शुक्र, चौथ्या घरात आहे. यामुळे शत्रू निर्माण होत वादा आणि मनःशांती बिघडण्याची शक्यता आहे. असे असले तरी आजचा दिवस आनंदाचा असेल. चौथ्या घरातील चंद्रामुळे तुमच्या संपत्ती आणि सौंदर्यात वाढ होईल. जवळच्या मित्राच्या सहकार्याने तुमचे एखादी प्रलंबित काम पूर्ण होईल. आज वेळेचा सदुपयोग करा.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या घरात आहे. या भावात चंद्र देखील आहे. आजचा दिवस तुमच्या कामात लक्षणीय सुधारणा घडवून आणणारा आहे. आज तुम्ही घेतलेला तज्ज्ञांचा सल्ला भविष्यात उपयुक्त ठरेल. तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा राहील.

धनु राशी- ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीचा स्वामी गुरू गेल्या काही दिवसांपासून कर्क राशीच्या आठव्या घरात भ्रमण करत आहे. याच परिणामि धनु राशीच्या लोकांवर होत आज अचानक धनलाभाचे योग आहे. ज्यामुळे तुमच्या आर्थिकस्थितीत सुधारणा होईल. असे असले तरी काही किरकोळ समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. तुमच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, यामुळे कायमस्वरूपी यश मिळेल.

मकर राशी- मकर राशीचा स्वामी शनि तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या घरात आणि चंद्र पहिल्या घरात भ्रमण करीत आहे, जो तुमचा आजचा दिवस व्यस्त असल्याचे संकेत देत आहे. आज तुम्ही व्यवसायावर प्रधान्याने लक्ष केंद्रित कराल. आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ त्रास देखील जाणवू शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. एकंदरीत आजचा दिवस व्यस्ततेसह संमिश्र स्वरुपाचा राहील.

कुंभ राशी- ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक फळ घेऊन येणारा आहे. शनि आज तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात असून तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. संपत्ती आणि सामाजिक कीर्ती वाढेल. शत्रूंची तुमच्या विरोधात सुरु असलेल्या गुप्त कारवाई कमी होतील आणि विजयी व्हाल. नशिबाची साथ लाभल्याने प्रत्येक कामात यश मिळेल.

मीन राशी- तुमच्या राशीचा स्वामी गुरू कर्क राशीत आहे. आज घरात शुभ घटना देखील घडू शकतात. धार्मिक कार्यात रस वाढेल. तसेच एक छोटीशी सहल शक्य आहे. रात्री कुटुंबासोबत काही वेळ घालवणे चांगले राहील. मार्गदर्शनामुळे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल. भावनांमध्ये वाहून जाऊन महत्त्वाच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करणे टाळा.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment