Horoscope 20 February 2026, राशीभविष्य: ग्रहांच्या हालचालींवरून राशीभविष्य निश्चित केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो जो त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रभाव पाडतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, गुरुवार, 20 फेब्रुवारीचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ राहत धनलाभाची शक्यता आहे तर काही राशींना सरासरी परिणाम मिळतील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी शुक्रवारी फायदा होईल आणि कोणत्या राशींच्या अडचणीत वाढ होईल.
मेष राशी – आज वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक विचार आणि तुमच्या कौशल्यांच्या बळावर तुम्हाला यश मिळेल. आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमचे प्रेम जीवन रोमँटिक राहील.
वृषभ राशी – आजचा दिवस खूप शुभकारक असणार आहे. तुमच्या आर्थिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन लवकरच धनसंपत्तीचं आगमन होईल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे सगळे मार्ग मोकळे होतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.
मिथुन राशी – आजचा दिवस तुम्हाला आरोग्याची समस्या निर्माण करणारा ठरेल. दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. ऑफिसमधील राजकारण तुमच्यासाठी नकारात्मक ठरू शकते. सकारात्मक मानसिकता ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने आज विश्रांती घ्या.
कर्क राशी – कर्क राशीसाठी शुक्रवार लाभगदायक असणार आहे. तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा योग लवकरच जुळून येणार आहे. मित्रांबरोबर तुमच्या भेटीगाठी वाढतील. तसेच, तुमचं आरोग्य चांगलं राहील.
सिंह राशी – आज कामासाठी बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. व्यवसाय, आरोग्य, आर्थिक बाबी किंवा प्रेम जीवनात मोठे बदल होऊ शकतात. यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा. तसेच बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा.
कन्या राशी – गुंतवणुकीसाठी धोरण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस आळशी ठरू शकतो. वेळेवर काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्या बाजूने असेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवणे लाभदायक ठरेल.
तूळ राशी – आज कामाच्या ठिकाणी वेळेवर काम पूर्ण न केल्यास वरिष्ठांकडून किंवा व्यवस्थापनाकडून नाराजी व्यक्त होऊ शकते. खर्च वाढण्याची शक्यता देखील आहे. आज आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे बाहेर खाणे टाळा. आजचा दिवस बदलांनी भरलेला असेल.
वृश्चिक राशी – आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित त्रास जाणवू शकेल. आरोग्याबद्दल निष्काळजीपणा करु नका. दिवस रोमँटिक आणि सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असलेल्यांनी आज त्यांच्या प्रेम जीवनात येणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करावे.
धनु राशी – तुमच्या प्रेम जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होतील. घरात आनंदी वातावरण असेल. परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. आज दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो. आजचा दिवस आर्थिक लाभ मिळवून देणारा ठरेल.
मकर राशी- आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल, परंतु तुमचे खर्चही जास्त राहतील. तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. भावा-बहिणींमध्ये एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.
कुंभ राशी – आज तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. तुम्हाला तुमचे कोणतेही काम उशिरापर्यंत पुढे ढकलण्याचे टाळावे लागेल, अन्यथा भविष्यात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमची जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तज्ञांच्या मताशिवाय पुढे जाऊ नका.
मीन राशी – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डेटची योजना कराल. तुमच्या करिअरमध्ये तुमचे स्थान स्थापित करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक परिस्थितीही मजबूत राहणार आहे.







