ICC Decide To Pakistan Fate : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. मात्र, या निर्णयास पाकिस्तानला कोणत्याही देशाकडून पाठिंबा मिळत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी पाकिस्तान एकटा पडला असून, निर्णय बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच, जर पाकिस्तानने आपला निर्णय बदलला नाही तर आयसीसी पाकिस्तानविरुद्ध खालीलप्रमाणे कठोर निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आयसीसी घेऊ शकते हे कठोर निर्णय
- स्पर्धेतून पूर्ण बंदी.
- आयसीसीकडून वार्षिक महसूल रोखला जाऊ शकतो.
- पीसीबीला महसूल तोट्यासाठी जिओ-स्टारची भरपाई करण्यास सांगितले जाऊ शकते.
- द्विपक्षीय मालिकेवरील बंदीमुळे डब्ल्यूटीसी गुण आणि आयसीसी क्रमवारीवर परिणाम होऊ शकतो.
- सर्व परदेशी खेळाडूंना (फ्री एजंट वगळता) पीएसएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते.
- पीसीबीला जिओ स्टारला झालेल्या नुकसानाची भरपाई करावी लागेल.
सूत्रांनुसार, “निवृत्त खेळाडू वा फ्री एजंट वगळता विद्यमान परदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पीएसएलमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली जाऊ शकते.” याव्यतिरिक्त, पीसीबीला आयसीसीच्या यजमान प्रसारक, जिओ-स्टारला लाखो डॉलर्सच्या कोणत्याही महसूल नुकसानाची भरपाई करावी लागेल.










