T20 World Cup 2026 : २०२६ चा टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच वादाचे केंद्र बनला आहे. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. जर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बांगलादेशला पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. सूत्रांसार, पाकिस्तानऐवजी बांगलादेशचा समावेश ग्रुप अ मध्ये होऊ शकतो. अर्थात त्यांना त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
पाकिस्तानची अनिश्चितता, आयसीसीचा प्लॅन बी
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने अद्याप टी२० विश्वचषक खेळणार की नाही हे स्पष्ट केलेले नाही. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी भेट घेतल्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सांगितले की, अंतिम निर्णय शुक्रवार वा पुढील सोमवारपर्यंत घेतला जाईल. या अनिश्चिततेमुळे, आयसीसीने स्पर्धेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार होऊ नये, म्हणून एक बॅकअप प्लॅन तयार केला आहे.
बांगलादेशच्या पुनरागमनाची शक्यता
भारतात सामने खेळण्यास नकार दिल्याने बांगलादेशला यापूर्वी स्पर्धेतून वगळण्यात आले होते. त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. आता, जर पाकिस्तानने माघार घेतली तर आयसीसी बांगलादेशला आणखी एक संधी देऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, या परिस्थितीत, बांगलादेश त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळेल. दरम्यान, सर्वांचे लक्ष आता पाकिस्तानच्या अंतिम निर्णयावर आहे.
पाकिस्तानचे वेळापत्रक
७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स
१० फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध अमेरिका
१५ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत
१८ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध नामिबिया










