8th Pay Commission Update : गेल्या काही काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची मोठी प्रतीक्षा आहे. आयोगाच्या अंतिम अहवालाला अजून वेळ असला, तरी त्यासंदर्भातील प्रत्यके घडामोड कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. अशात मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे 8व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि नियुक्ती मंत्रालयांतर्गत संचालक पद भरण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
खर्च विभागानुसार, या पदावर आशिष यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी तात्कळ पदभार स्वीकारला आहे. या पदावर कार्यरत असलेली व्यक्ती 8व्या वेतन आयोगाच्या प्रशासकीय तसेच धोरणात्मक तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजवणार आहे. त्यामुळे आयोगाच्या अटी, शर्ती आणि धोरणांबाबतचे निर्णय आता जलद होण्याची शक्यता आहे.
या आयोगाचे अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुलक घोष आणि पंकज जैन हे सदस्य सचिव म्हणून काम पाहत आहेत. नवी दिल्ली येथे आयोगाचे मुख्यालय असून, पुढील दीड वर्षांत आयोग शिफारशी सादर करणार आहे. या शिफारशींच्या आधारेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते निश्चित केले जाणार आहेत.
‘काम तसे दाम’ प्रणाली लागू होण्याची चर्चा
दरम्यान, खासगी क्षेत्राप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ‘काम तसे दाम’ म्हणजेच Performance Based Pay प्रणाली लागू होण्याची चर्चा आहे. कामगिरीच्या आधारे वेतनवाढ, भत्ते आणि इतर लाभ देण्याबाबत आयोग विचार करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)









