Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत हिमाचल प्रदेशविरुद्ध ८२ धावांची धमाकेदार खेळी केली. दुखापतीनंतर पहिल्यांदाच क्रिकेट खेळत असलेल्या अय्यरने त्याच्या डावात १० चौकार आणि तीन षटकार मारले. विशेषतः धाव न घेता तब्बल ५८ धावा केल्या, यामुळे पुनरागमन असेल तर श्रेयस अय्यरसारखे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबईने पहिले दोन विकेट गमावले. जयस्वाल १८ चेंडूत १५ धावा काढून बाद झाला, तर सरफराज खानने १० चेंडूत २१ धावा केल्या. श्रेयस अय्यरने मुशीर खानसोबत शानदार भागीदारी केली.
अय्यरने सुरुवात मंदावली, पहिल्या १८ चेंडूत फक्त ८ धावा काढल्या, त्यानंतर फटकेबाजी केली. २० डॉट बॉल खेळूनही, अय्यरने प्रत्येक चौथ्या चेंडूवर चौकार मारला, जो उल्लेखनीय आहे.
दरम्यान, अय्यरची न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली असली तरी, मालिकेतील त्याचा सहभाग त्याच्या सामन्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.
म्हणूनच बीसीसीआयने त्याला विजय हजारे ट्रॉफी सामन्यात खेळून त्याची तंदुरुस्ती सिद्ध करण्यास सांगितले. आता या खेळाडूने त्याची तंदुरुस्ती तसेच त्याचा फॉर्म सिद्ध केला आहे.









