होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धक्कादायक ! जळगावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

On: March 1, 2026 5:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव शहरातून अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेत नराधमाने अवघ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपीविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक कोळी याने जळगाव शहरात राहणाऱ्या एका 13 वर्षीय बालिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडित मुलगी आणि आरोपी हे शेजारीच राहतात. दरम्यान, 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान, घरात कोणीही नव्हते, तेव्हा आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला. तुझ्या पप्पांना मारून टाकीन, अशी धमकी देत पीडितेवर आत्याचार करत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

नराधम ऐवढ्यावरच थांबला नाही, तर तो पीडितेला वारंवार फोन करून त्रास देऊ लागला. पीडित मुलगी शाळेत जात असतानाही तो तिचा रस्ता अडवून तिला भेटण्यासाठी सक्ती करत होता. अखेर या जाचाला कंटाळून पिडीतेने पालकांना सांगितले.

त्यानुसार,पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment